अनुष्का शर्मा आणि साक्षी धोनी होत्या क्लासमेट; दोघींनी केव्हा घेतले सोबत शिक्षण?

Anushka Sharma-Sakshi Dhoni

अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची पत्नी साक्षी (Sakshi) यांच्यात एक गोष्ट साम्य (Commom) आहे. दोघीही टीम इंडियाच्या क्रिकेटर्सच्या पत्नी आहेत. तथापि, फारच कमी लोकांना माहिती आहे की, याव्यतिरिक्त त्यांच्यात आणखी एक गोष्ट सामान्य आहे. दोघीही वर्गमैत्रिणी होत्या. याबाबत अनुष्काने बर्‍याच वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात सांगितले होते. अनुष्काने सांगितले की, मी आणि साक्षी आसामच्या छोट्या गावात एकत्र राहात होतो. जेव्हा तिने मला ती कोठे राहात असल्याचे सांगितले तेव्हा मी म्हणाले, व्वा, मीही तिथे राहिले होते. साक्षीने सांगितले की, मी त्या शाळेत शिकले आहे, म्हणून मी म्हणाले की, ती माझीसुद्धा शाळा होती. दोघीही एका काळात एकाच गावात राहात होत्या.

त्या काळात या मैत्रिणी नव्हत्या; पण एकदा अनुष्का शर्माला अचानक तिच्या बालपणीचा फोटो मिळाला. त्यात साक्षी धोनी हीदेखील आहे. त्या फोटोमध्ये अनुष्का शर्माने घागरा परिधान केला होता. दोघीही सध्या एका मुलीची आई आहेत. अनुष्का शर्माने सोमवारी मुलीला जन्म दिला आहे, तर साक्षीची मुलगी जीवा पाच वर्षांची आहे. महेंद्रसिंग धोनी सध्या क्रिकेटपासून दूर आहे, तर विराट कोहली आता टीम इंडियाचा कर्णधार आहे. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी डिसेंबर २०१७ मध्ये लग्न केले. त्यांनी गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये जाहीर केले होते की, जानेवारी २०२१ मध्ये छोटा पाहुणा त्यांच्या घरी येणार आहे.

सोमवारी विराट कोहलीने (Virat Kohli) चाहत्यांसमवेत हा आनंद शेअर करून लिहिले की, ‘आज दुपारी आम्हाला एक मुलगी असल्याचे सांगून आम्हाला दोघांनाही आनंद झाला. आम्ही तुमच्या प्रेम आणि शुभेच्छांसाठी आभारी आहोत. अनुष्का आणि आमची मुलगी दोघेही अगदी ठीक आहेत आणि आयुष्याचा हा अध्याय आम्हाला मिळाला हे आमचे चांगले भाग्य आहे. आम्हाला माहीत आहे की, तुम्ही निश्चितपणे हे समजून घ्याल की यावेळी आम्हाला थोडी गोपनीयता हवी आहे.’

ही बातमी पण वाचा : विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांना कन्यारत्न

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER