अनुष्का आणि करिनाने दाखवली त्यांच्या बाळांची झलक

प्रख्यात बॉलिवूड अभिनेत्री आणि भारतीय क्रिकेट टीमचा कप्तान विराट कोहलीची (Virat Kohli) पत्नी अनुष्काने (Anushka Sharma) 11 जानेवारी रोजी एका मुलीला जन्म दिला होता. तर त्यानंतर काही दिवसांनीच म्हणजे 21 फेब्रुवारीला करिना कपूरने (Kareena Kapoor) दुसऱ्या मुलाला जन्म दिला होता. या दोघाचे चेहरे सोशल मीडियावर (Social Media) कधी दिसतील याची वाट या दोघींचे प्रशंसक पाहात होते. सोमवारी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने करिनाने तिच्या मुलाची पहिली झलक सोशल मीडियावर दाखवली तर विराट-अनुष्काने पुन्हा एकदा त्यांच्या मुलीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला.

करिनाच्या मुलाला पाहाण्याची अनेकांची इच्छा होती आणि आहे. ही बाब लक्षात घेऊन करिनाने सोमवारी महिला दिनानिमित्त एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोत करिनाने सफेद कपड्यात गुंडाळलेल्या बाळाला जवळ धरलेले दिसत आहे. करिनाने मेकअपही केलेला नसल्याचेही फोटोत दिसत आहे. या फोटोला करिनाने कॅप्शन दिली आहे. ‘असे काहीही नाही जे एक स्त्री करू शकणार नाही. हॅप्पी वुमेन्स डे.’

आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधत विराट कोहली आणि अनुष्का शर्मानेही त्यांच्या मुलीची झलक सोशल मीडियावर शेअर केली.. विराट कोहलीने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर अनुष्का आणि मुलीचा एक फोटो शेअर करीत एक अत्यंत इमोशनल मेसेज देत महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. विराटने पोस्ट केलेल्या फोटोत अनुष्काने वामिकाला (विराट अनुष्काच्या मुलीचे नाव वामिका आहे.) जवळ घेतले असून ती तिच्याशी खेळताना दिसत आहे. या फोटोसोबत विराटने लिहिले आहे- ‘एखाद्या बाळाला जन्म देताना पाहणे हा एक खूपच अविश्वसनीय आणि ज़बरदस्त अनुभव आहे. हे पाहिल्यानंतर तुम्हाला स्त्रीच्या खऱ्या ताकदीची आणि दिव्यत्वाची जाणीव होते. त्या पुरुषांपेक्षा अधिक ताकदवान आहेत त्याचवेळेस त्या अत्यंत ममतामयीही असतात. तेव्हा जाणवते की, परमेश्वराने त्यांची रचना तशी का केली आहे. माझ्या जीवनातील एक अत्यंत आक्रमक, ममतामयी, ताकदवान महिला मोठी झाल्यावर तिच्या आईसारखीच बनेल. महिला दिनाच्या शुभेच्छा. जगातील सगळ्या अद्भुत महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा असेही विराटने लिहिले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER