करण कुंद्रा धोका देत असल्याने त्याच्यापासून दूर होण्याचा निर्णय घेतला अनुषा दांडेकरने

Maharashtra Today

प्रख्यात मॉडेल आणि व्हीजे अनुषा दांडेकरने (Anusha Dandekar) काही वर्षांच्या डेटिंगनंतर गेल्या वर्षी बॉयफ्रेंड करण कुंद्रासोबत (Karan Kundra) ब्रेकअप केला होता. ब्रेकअपनंतर अनुषाने या विषयावर बोलणे टाळले होते. पण आता, करण कुंद्रा धोका देत असल्यानेच मी त्याच्यापासून दूर होण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली आहे.

करणपासून ब्रेक घेतल्यानंतर मी अत्यंत वाईट मन:स्थितीत होते. त्यातून मी कशी सावरले ते मलाच ठाऊक आहे, असेही अनुषाने सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट लिहून म्हटले आहे.

अनुषा आणि करण छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय जोडी होती. जवळ-जवळ पाच वर्षे हे दोघे एकमेकांना डेटिंग करीत होते. त्यानंतर दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले होते. अनुषापूर्वी करण कुंद्रा कृतिका कामरासोबत डेटिंग करीत होता. या दोघांचे ‘कितनी मोहब्बते हैं’ या मालिकेच्या सेटवर प्रेम जुळले होते. मात्र अनुषासाठी करणने कृतिका कामराला डच्चू दिला होता. अनुषा आणि करणने ‘लव्ह स्कूल’ नावाचा एक शो केला होता. यात अनुषा प्रेमाच्या टिप्स देत असे. मात्र या दोघांचा गेल्या वर्षी ब्रेकअप झाला. अनुषा आणि करणचा ब्रेकअप झाला होता तरीही करण ते मान्य करण्यास नकार देत होता. त्यामुळेच अनुषाने सोशल मीडियावर हा खुलासा केला आहे. एका फॅनने तिला ब्रेकअपनंतर कशी सावरलीस, असा प्रश्न केला असता तिने यावर सविस्तर उत्तर दिले आहे. सोशल मीडियावरील पोस्टमध्ये अनुषाने म्हटले आहे, तो माफी मागेल याची मी वाट पाहात होते. परंतु ते घडले नाही.

ब्रेकअपनंतर मी पूर्णपणे आतून उद्ध्वस्त झाले होते. मी स्वतःवरच प्रेम करीत होते आणि मी अशा एका व्यक्तीच्या शोधात होते जो माझ्यासोबत राहील, मला हसवेल आणि माझ्याशी प्रामाणिक राहील. परंतु माझे हे सर्व अंदाज चुकीचे ठरले आणि मला अत्यंत नाइलाजाने हृदयावर दगड ठेवून ब्रेकअप करावा लागला, असेही अनुषाने म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button