अनुराग-तापसी प्रकरण : आयकर विभागाला सापडला पुरावा; ६५० कोटींची हेराफेरी

anurag kashyap - taapsee pannu

मुंबई :  दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांच्याविरोधात आयकर विभागाला पुरावा सापडला आहे. कोट्यवधींची हेराफेरी झाल्याचे आयकरला समजले. आयकर विभागाच्या हाती ६५० कोटी रुपयांच्या करचोरीचे पुरावे लागले. ३ मार्चला आयकर विभागाने अनुराग आणि तापसीच्या मालमत्तेवर धाडी टाकल्या. यात दोन फिल्म प्रॉडक्शन, दोन टॅलेंट मॅनेजमेंट कंपन्यांचा  समावेश आहे. मुंबई, पुणे, दिल्ली, हैदराबादमध्ये एकूण ३० ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. दरम्यान या प्रॉडक्शन हाऊसच्या इन्कम आणि शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात हेराफेरी झाल्याचे पुरावे सापडले आहेत.

अनुराग-तापसी प्रकरणात ६५० कोटी रुपयांची हेराफेरी झाल्याचे दिसून आले. तापसी पन्नूच्या नावाने पाच  कोटी रुपयांची कॅश रिसीटही सापडली आहे. याशिवाय २० कोटींबाबतही पुरावे सापडले आहेत. फँटम आणि क्वान या दोन्ही टॅलेंट मॅनेजमेंट कंपनीमार्फत मोठ्या रकमेचा ई-मेल, व्हॉट्सप चॅट्स असा डिजिटल डेटा हार्ड डिस्क स्वरूपात सिझ करण्यात आला आहे. यावर तपास सुरू आहे. ‘फँटम फिल्म’ आणि ‘क्वान’ या कंपन्यांशी संबंधित धाडी टाकण्यात आल्या. करचोरी केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आल्याचे आयकर विभागाने स्पष्ट केले.

फँटम फिल्म्स चित्रपट निर्मिती आणि त्याचे वितरण करण्याचे काम करते. अनुराग कश्यप, दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवाणे, निर्माता मधू मंटेना आणि विकास बहल यांनी ही कंपनी २०११ मध्ये सुरू केली होती. सहसंस्थापक विकास बहलवर लैंगिक शोषणाच्या  आरोपानंतर ही कंपनी २०१८ मध्ये बंद करण्यात आली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER