अनुराग कश्यप, तापसी पन्नू यांच्या मालमत्तांवर धाडी !

Anurag Kashyap, income tax against Tapsi Pannu

मुंबई : सोशल मीडियातून भूमिका मांडणाऱ्या व सातत्याने चर्चेत असलेले प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप (Anurag Kashyap) आणि अभिनेत्री तापसी पन्नू (Tapasi Pannu) यांच्याविरोधात आयकर विभागाने कारवाई सुरू केली आहे. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी अनुराग कश्यप आणि तापसीच्या मालमत्तांवर छापे टाकले आहेत. अनुराग आणि तापसीसह विकास बहल आणि मधु मंटेना यांच्या घरीही आयकरने छापे टाकले आहे.

आज आयकर विभागाने अनुराग कश्यप आणि तापसी पन्नूच्या मालमत्तांवर छापे मारले. ‘फँटम फिल्म’शी संबंधित लोकांच्या घरांवर छापे टाकले. त्याचबरोबर मधू मंटेना यांची कंपनी ‘क्वान’ यांच्या कार्यालयावरही छापे टाकले. हे छापे कर चुकवल्याच्या आरोपाखाली टाकण्यात आले आहेत. आयकर विभागाकडून मुंबईतील २२ ठिकाणांची झडती घेतली जात आहे. यात फँटम प्रॉडक्शन हाऊसशी संबंधित अनुराग कश्यप, तापसी पन्नू, विकास बहल आणि मधू मंटेना यांच्या मालमत्तावर आयकरने धाडी टाकल्या.

करचोरी केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे आयकर विभागाने सांगितले आहे. या करचोरी प्रकरणाचा तपास सुरू आहे, असे आयकरने म्हटले आहे. ‘फँटम फिल्म्स’ चित्रपटनिर्मिती आणि त्याचे वितरण करण्याचे काम करते. अनुराग कश्यप, दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवाणे, निर्माता मधू मंटेना आणि विकास बहल यांनी ही कंपनी २०११ मध्ये सुरू केली. सहसंस्थापक विकास बहलवर लैंगिक शोषणाचा आरोप झाल्यानंतर कंपनी २०१८ मध्ये बंद करण्यात आली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER