अनुपम खेर च्या मुलाने इंस्टाग्राम वरून कामाची मागणी केली

Anupam Kher's - sikhandar kher

प्रख्यात अभिनेता आणि अभिनय शिकवण्याचे क्लासेस सुरू करणाऱ्या अनुपम खेर (Anupam Kher) यांचा सिकंदर हा मुलगा आहे. सिकंदरची आई किरण खेरही (Kiren Kher)बॉलीवूडमधील यशस्वी अभिनेत्री आहे. सिकंदरने वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता. चांगली हाईट बॉडी असूनही त्याला पित्याप्रमाणे यश मिळवता आले नाही. तो यशासाठी अजूनही चाचपडत आहे. पित्याची एवढी ओळख असूनही त्याला म्हणावे तसे काम मिळत नाही. त्यामुळेच कदाचित तो आता सोशल मीडिया वरून काम मागू लागला आहे.

काही महिन्यापूर्वी सिकंदर खेरने डिज्नी प्लस हॉट स्टारच्या ‘आर्या’ या वेब सिरीज मध्ये काम केले होते. मात्र यात त्याची भूमिका सहाय्यक अभिनेत्याची होती. मुख्य भूमिकेत सुष्मिता सेन होती. ही वेब सिरीज प्रेक्षकांना आवडली असली तरी त्याचा सिकंदर खेरला म्हणावा तसा फायदा झालेला नाही. या वेबसिरीज नंतर सिकंदरने एक-दोन चित्रपट आणि काही मालिकांमध्ये काम केले खरे, परंतु तो स्वतःचे स्थान बनवू शकला नाही. सिकंदरला कामाची आवश्यकता असल्यानेच त्याने इंस्टाग्रामवर काम पाहिजे अशी पोस्ट टाकली आहे. सिकंदरने इंस्टाग्राम वर स्वतःचा एक अत्यंत त्रासलेल्या लूक मधील फोटो पोस्ट केला आहे यात त्याच्या कपाळावर घामाचे थर दिसत असून तो जराही हसताना दिसत नाही. या फोटो सोबतच सिकंदरने लिहिले आहे, मला काम पाहिजे मग मी हसू शकेन.

सिकंदरच्या या पोस्टवर लोकांनी खूपच मजेदार कमेंट केलेल्या आहेत. एका युजरने कमेंट करताना लिहिले आहे की, अमिताभ बच्चन नंतर तुम्हीच सगळ्यात जास्त व्यस्त अभिनेते आहात. यावर सिकंदरने उत्तर देताना म्हटले की, तुम्हाला असे वाटते का की मी वाटीभर पाण्यात बुडलो पाहिजे.

तर काही युजर्सनी सिकंदरच्या चित्रपटांची नावे देऊन तो खूप चांगला अभिनेता असल्याचे सांगत त्याची प्रशंसा केली. यावर सिकंदरने त्या युजर्सना धन्यवाद दिले आहेत.

सिकंदरच्या या पोस्टला बॉलिवूडमधील निर्माते-दिग्दर्शक किती गंभीरतेने घेतात हे त्याला आगामी काळात मिळणाऱ्या प्रोजेक्टवरूनच दिसून येईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER