
चित्रपट निर्माते विवेक रंजन अग्निहोत्री यांच्या ‘द काश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) चित्रपटाचे शूटिंग सध्या मसूरीमध्ये सुरू आहे. मंगळवारी अभिनेता अनुपम खेर चित्रपटाच्या शूटिंगसाठी पत्नी अभिनेत्री आणि खासदार किरण खेरसमवेत मसूरीला पोहोचले. सांगण्यात येते की चित्रपटाचे अभिनेते मिथुन चक्रवर्ती शूटसाठी काही दिवसांपूर्वी मसूरीला पोहोचले होते.
अभिनेता अनुपम खेरने (Anupam Kher) मंगळवारी संध्याकाळी अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला. व्हिडिओ देहरादूनच्या जौलीग्रांट विमानतळावर उतरण्याच्या वेळेसचा आहे. त्यात त्यांनी लिहिले आहे की, ‘देहरादून में उतरते हुए हमारा विमान और उसकी परछाई’. वास्तविक, खाली दिलेल्या व्हिडिओमध्ये, देहरादूनच्या जौलीग्रांट विमानतळाभोवती एक सुंदर दृश्य दिसत आहे, त्यांच्या फ्लाइटची सावलीही त्यात दिसत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपट अभिनेता अनुपम खेर मंगळवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास किताब घर येथील सवाई हॉटेलमध्ये पोहोचले. त्यांच्या सोबत अभिनेत्री आणि खासदार किरण खेर होत्या. यावेळी त्यांच्या चाहत्यांची गर्दी हॉटेलच्या मुख्य द्वारावर जमा झाली. ते थेट हॉटेलच्या आत गेले. त्यांची एक प्रशंसक प्रियाने सांगितले की ती किताब घर चौकात उभी होती, अचानक तिला अनुपम खेर आणि किरण खेर गाडीत दिसले आणि ती कारच्या मागे पळत आली, परंतु तोपर्यंत ती गाडी हॉटेलच्या गेटच्या आत गेली होती. यामुळे तिला निराश होऊन परतावे लागले.
सांगण्यात येते की गेल्या काही दिवसांपासून मसूरीमध्ये ‘द काश्मीर फाइल्स’चे शूटिंग सुरू आहे. आतापर्यंत चित्रपटाचे चित्रीकरण लाल टिब्बा येथील सिस्टर बाजार, किताब घर, पार्क स्टेटमध्ये केले गेले आहे. ते पुन्हा २० डिसेंबर रोजी सिस्टरबाजार येथे चित्रपटाच्या शूटिंगला येणार आहे. या चित्रपटातील अभिनेता अनुपम खेर यांच्यावर शॉट्स शूट होणार आहेत. हा चित्रपट काश्मिरी पंडितांच्या कथेवर आधारित आहे. मसूरीला काश्मीर म्हणून दर्शवित शूटिंग करण्यात येत आहे.
Our plane, our plane’s shadow and I landed in Dehradun at the same time. 😍🤓😎 #ChasingFlight #KuchBhiHoSaktaHai pic.twitter.com/BZ5kOowaWE
— Anupam Kher (@AnupamPKher) December 15, 2020
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला