अनुपम खेर आणि सतीश कौशिक पुन्हा एकत्र

Anupam Kher

सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर आधारित ताश्कंद फाईल्स चित्रपट काढून लोकप्रिय झालेला दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री आका द लास्ट शो नावाचा चित्रपट तयार करीत आहे. खरे तर एप्रिल मे मध्येच चित्रपटाचे शूटिंग सुरु होणार होते. परंतु लॉकडाऊनमुळे शूटिंग सुुरू होऊ शकले नाही. मात्र या महिन्याच्या मध्यापासून चित्रपटाचे शूटिंग सुरु केले जाणार आहे. अनुपम खेरने या चित्रपटाबाबत सोशल मीडियावर माहिती दिली. ही मैत्री, त्याग आणि संघर्षाची कथा असून आम्ही चार मित्र सतीश कौशिक, रुमी जाफरी, विवेक अग्निहोत्री आणि मी असे एकत्र येऊन या चित्रपटाची निर्मिती करीत आहोत. एक प्रकारे हा आमच्या मैत्रीचा उत्सव आहे. कोरोना असल्यामुळे सेटवर योग्य ती काळजी घेऊन शूटिंग केले जाणार असल्याचेही अनुपम खेर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. अनुपम खेर आणि सतीश कौशिक यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये एकत्र काम केलेले आहे. तसेच या दोघांमध्ये खरोखरही चांगली मैत्री आहे. अनेक वर्षानंतर हे दोघे पुन्हा एकत्र केवळ दिसणार नसून चित्रपटाची निर्मितीही करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER