ऋषी कपूरच्या आठवणीत रंगले अनुपम खेर आणि नीतू कपूर

Rishi Kapoor - Neetu Kapoor - Anupam Kher

अनुपम खेर (Anupam Kher) आणि ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांची चांगलीच मैत्री होती. ऋषी कपूर जेव्हा अमेरिकेत कॅन्सरवर उपचार करायला गेला होता, तेव्हा अनुपम खेरने त्याची येथे जाऊन भेट घेतली होती. ही आठवण नुकतीच अनुपम खेरने ताजी केली. याला निमित्त होते नितीन कपूरशी झालेली भेट. नीतू कपूर सध्या चंदीगडमध्ये एका चित्रपटाच्या शुटिंगसाठी पोहोचली आहे. बऱ्याच वर्षानंतर आणि ऋषी कपूर यांच्या निधनानंतर नीतू कपूर (Neetu Kapoor) प्रथमच कॅमेऱ्याला सामोरी जात आहे. ‘ जुग जुग जियो ‘ नावाच्या चित्रपटात नीतू कपूर काम करीत आहे या चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान नीतू कपूर आणि अनुपम खेर यांची भेट झाली. नीतू कपूर प्रथमच ऋषी कपूर विना अनुपम खेर यांना भेटत होती त्यामुळे दोघेही खूपच भावनात्मक झाले होते. अनुपम खेर यांनी इंस्‍टाग्राम वर या भेटीची माहिती पोस्‍ट केली आहे. पोस्टमध्ये अनुपम खेर यांनी म्हटले आहे की या संपूर्ण भेटीत आम्ही ऋषी कपूरच्या आठवणीत गुंगुन गेलो होतो. माझ्या डोळ्यासमोर सारखा ऋषी कपूर येत होता आणि न्यूयॉर्कमध्ये त्याच्याशी झालेली भेट सतत आठवत होती. या पोस्टसोबतच अनुपम खेर यांनी तीन फोटोही शेअर केले आहेत.

या फोटोत अनुपम खेर ऋषी कपूर आणि नीतू कपूर सोबत दिसत असून एका फोटोमध्ये रितेश आणि जेनेलिया ही या तिघांसोबत दिसत आहे. अनुपम खेर यांनी पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे, प्रिय नेता काल रात्री ऋषी कपूर विना तुझ्याशी झालेली भेट न्यूयॉर्कमधील जुन्या भेटींची आठवण जागी करणारी होती. आपण एकत्र अश्रू ढाळले आणि त्या अश्रूंमुळे आपले संबंध आणखी मजबूत झाले. हे फोटो पाहिले की जाणवते चिंटू जी चे व्यक्तिमत्व लार्जर दॅन लाईफ होते. आज तुम्हाला काम करताना बघून मला खूप आनंद होत आहे. पुन्हा काम सुरू केल्याने तुम्ही ऋषी कपूरला सगळ्यात जास्त आनंद दिला आहे. मी तुमचा मित्र असून नेहमी तुमच्या सोबत असेन. एक गोष्ट लक्षात ठेवा, काही नाती ही टेपरेकॉर्डर मधील पॉज बटनासारखी असतात. ती नाती इथूनच सुरू होतात जेथे पॉज केलेली असतात.

शूटिंग सुरू केल्यानंतर नीतू कपूर यांनीही शूटिंगच्या दरम्यानचा कॅमेरा मागील एक फोटो इंस्टाग्राम वर शेअर केला होता या फोटोसोबत दिलेल्या कॅप्शन मध्ये नीतू कपूर यांनी सेटवर थोडे घाबरायला झाले असे लिहिले आहे. यासोबतच ऋषी कपूर यांचे आठवण काढून सेटवर ऋषी कपूर यांनी दिलेले प्रेम आणि त्यांचे अस्तित्व जाणवते असेही म्हटले आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER