
प्रख्यात भजन सम्राट अनुप जलोटा (Anup Jalota) यांनी यापूर्वी अनेक सिनेमांमध्ये काम केले आहे. छोट्या पडद्यावरील बिग बॉसमध्येही (Big Boss) त्यांनी आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली होती. आता अनूप जलोटा प्रेक्षकांसमोर सत्य साईबाबा (Satya Saibaba) बनून येणार आहेत. सत्य साईबाबांच्या जीवनावर एक सिनेमा तयार झाला असून अनुप जलोटा यांनी या सिनेमात सत्य साईबाबांची भूमिका साकारली आहे. मी सत्य साईबाबांचा भक्त असून त्यांच्या सिद्धांत आणि आदर्शांवर मी विश्वास ठेवतो. त्यांना मी अत्यंत जवळून पाहिलेले आहे. त्यामुळे सत्य साईबाबांची भूमिका साकारण्याची संधी मला मिळाली याचा मला खूप आनंद झाला आहे अशी प्रतिक्रिया अनुप जलोटा यांनी दिली.
बालाकृष्ण श्रीवास्तव द्वारा निर्मित या सिनेमाचे दिग्दर्शन विक्की राणावतने केले आहे. सिनेमात अनुप जलोटा यांच्यासोबत जॅकी श्रॉफ, गोविंद नामदेव, साधिका रंधावा, अरुण बक्षी आणि मुश्ताक खान यांच्याही भूमिका आहेत. या सिनेमाला संगीत दिले आहे बप्पी लाहिरी यांनी. हा सिनेमा पुढील महिन्यात 22 जानेवारी रोजी रिलीज केला जाणार आहे. विशेष म्हणजे हिंदीसोबतच इंग्रजी, तेलुगु आणि मराठी भाषेतही हा सिनेमा प्रेक्षकांसमोर येणार आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला