एंटीलियाची जमीन वक्फ़ बोर्डाची संपत्ती आहे – राज्य सरकार

Antilia

मुंबई : वक्फ बोर्डाने 11 वर्षांनंतर एंटीलियाच्या संबंधात मुंबई उच्चन्यायात एक प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. या प्रतिज्ञापत्रात महाराष्ट्र वक्फ मंडळाने मान्य केले आहे की एंटीलिया महाराष्ट्र वक्फ बोर्डाची संपत्ती आहे. हि जागा वक्फच्या कायद्यानुसार नोंदणीकृत आहे. वक्फ कमिशनरच्या सर्वेक्षण अहवालाच्या २००३ च्या यादीतही याची नोंद झाली आहे. याबाबत वक्फ सर्वे आयुक्त २००३ सर्वेक्षण अहवालात असे म्हटले आहे की, येथे कुरानखानी (कुरान शिक्षण) साठीची जागा आहे.

याठिकाणी अनाथ मुस्लिम मुले नमाज अदा करतात. आणि १९३४ साली याठिकाणी नमाज अझान आणि कुरनखानी (कुराण शिकवणे) यांचा उल्लेख आहे ज्यामुळे हि जागा वक्फची मालमत्ता असल्याचं सिद्ध होते. मुकेश अंबानी यांनी वक्फ फंडात १६ लाख जमा केले आहेत.

वक्फ बोर्डाने २००५ मध्ये एनओसी देण्यासाठी गैर-कायदेशीर बैठक बोलावली, ज्यामध्ये वक्फ मंडळाचे सदस्य हारून सोलकर आणि डॉ. एम.ए. अजीझ यांनी ही जमीन एंटीलियाला विकण्यासाठी एनओसी दिली. वक्फ मंडळाचे विद्यमान अध्यक्ष यांनी मात्र याला विरोध केला असूनफसवणूक केल्याचं म्हटले आहे. २००७ मध्ये, वक्फ मंडळाच्या दुसऱ्या सदस्याने या फसवणुकीवर केंद्र सरकारला एक पत्र लिहिले आणि केंद्र सरकारच्या अल्पसंख्यांक विभागाच्या सचिवाने नोटीस बजावली आणि विचारणा केली की, या गुन्ह्यात सीबीआय चौकशी का केली गेली नाही.

याप्रकरणात काँग्रेसच्या मागील सरकारने सीबीआय चौकशीचे आदेश दिले नव्हते, मात्र आताचे सरकार देऊ शकतात. या बाबतीत केंद्रीय वक्फ परिषदेचे सदस्य एड. एजाज अब्बास यांनी मनी केले आहे की, बोर्डाने न्यायालयात दाखल केलेल्या २१ पानांच्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, एंटीलियाची जागा हि वक्फ बोर्डाची संपत्ती आहे.