अँटिगा : मेहुल चोक्सीचे नागरिकत्व रद्द करण्याची प्रक्रिया सुरू पण …

Mehul Choksi

नवी दिल्ली :- पंजाब नॅशनल बँक घोटाळा आणि मनी लाँडरिंगचा आरोप असलेल्या नीरव मोदीचा मामा मामा मेहुल चोक्सीचे अँटिगाचे नागरिकत्व रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे पण, ही प्रक्रिया दीर्घकाळ चालू शकेल. त्याचे अँटिगाचे नागरिकत्व रद्द झाल्यानंतर त्याचे भारतात प्रत्यार्पण होऊ शकेल, हे उल्लेखनीय.

कॅरिबियन देश ‘अँटिगा आणि बार्बुडा’ने गुंतवणूक कार्यक्रमांतर्गत नोव्हेंबर २०१७ साली मेहुल चोक्सीला नागरिकत्व बहाल केले होते. त्यांचे नागरिकत्व मागे घेण्याची प्रक्रिया अँटिगाने सुरू केली आहे. त्यामुळे मेहुल चोक्सीच्या अडचणींत वाढ होते आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात चोक्सीने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे.

एका वृत्तपत्राने म्हटले आहे की, मेहुल चोक्सीचे नागरिकत्व गेल्या वर्षीच रद्द करण्यात आले, अशी माहिती केंद्रीय ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (CBI) आणि अंमलबजावणी संचालनालय (ED) च्या दोन अधिकाऱ्यांनी दिली आहे. पण यानंतर चोक्सीने नागरिकत्व मागे घेण्याच्या निर्णयाविरोधात अँटिगाच्या कोर्टात खटला दाखल केला. सध्या हा खटला न्यायप्रविष्ट आहे.

मेहुल चोक्सीचे भारतातील वकील विजय अग्रवाल म्हणालेत की, माझा क्लायंट मेहुल चोक्सीने अँटीगाचा नागरिक असल्याचे जाहीर केले आहे. त्याचे नागरिकत्व मागे घेतलं जाणार नाही. मात्र, अँटिगाचे पंतप्रधान गेस्टन ब्राउनचे चीफ ऑफ स्टाफ लिओनेल हर्स्ट यांनी सांगितलं की, मेहुल चोक्सीचे नागरिकत्व मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी बराच काळ लागू शकतो.

लिओनेल यांनी एका टीव्ही वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, सरकारने चोक्सीचं नागरिकत्व मागे घेण्याचा प्रयत्न केला. पण चोक्सीने त्याविरोधात अँटिगा आणि बार्बुडा उच्च न्यायालयात खटला दाखल केला आहे. ही प्रक्रिया पूर्ण होणास सुमारे ७ वर्षे लागू शकतात. शिवाय चोक्सी उच्च न्यायालयातला हा खटला हारला, तर कोर्ट ऑफ अपील्स आणि लंडनच्या द प्रिवी काऊन्सिलमध्येही याचिका दाखल करू शकतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER