‘कोविशिल्ड’ घेतल्यानंतरही अ‌ॅण्टीबॉडीज निर्माण झाल्या नाहीत; अदर पूनावालांविरोधात तक्रार

Adar Poonawala

लखनौ : ‘कोविशिल्ड’ लस (covishield injection) घेतल्यानंतरही रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याऱ्या अ‌ॅण्टीबॉडीज (प्रतिपिंडे) निर्माण झाल्या नाहीत अशी तक्रार प्रताप चंद्रा या व्यक्तीने आशियाना पोलीस ठाण्यात केली आहे. तक्रारीत अदर पूनावाला (Adar Poonawala) यांच्यासोबत डीजीसीएचे संचालक, आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल, आयसीएमआरचे संचालक बलराम भार्गव, राष्ट्रीय आरोग्य मोहीम संचालक अपर्णा उपाध्याय तसंच इतरांची नावं आहेत.

प्रताप चंद्रा यांनी म्हटले आहे की, ८ एप्रिल रोजी कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेतला. २८ दिवसांनी लसीचा डोस मिळणे अपेक्षित असताना त्या दिवशी दुसऱ्या डोसचा कालावधी सहा आठवड्यांनी वाढवण्यात आला. यानंतर सरकारने हा कालावधी १२ आठवडे वाढवला. पहिला डोस घेतल्यानंतर मला बरे वाटत नव्हते. त्यांनी आयसीएमआरचे संचालक बलराम भार्गव यांच्या वक्तव्याचा दाखला दिला ज्यामध्ये त्यांनी कोविशिल्ड लसीच्या पहिल्या डोसनंतर शरीरात प्रतिपिंडे तयार होत असल्याचे म्हटले आहे. मी सरकारमान्य लॅबमध्ये चाचणी केली असता शरीरात कोरोनाशी लढण्यासाठी प्रतिपिंडे तयार झाली नसल्याचे निष्पन्न झाले.

माझ्या प्लेटलेट्स तीन लाखांहून दीड लाखांवर आल्या होत्या, असे चंद्रा म्हणालेत. लस घेतल्यानंतर माझ्या प्लेटलेट्सची संख्या निम्म्याने कमी झाली असून कोरोनाची लागण होण्याची शक्यता वाढली आहे, असा आरोप प्रताप चंद्रा यांनी केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल करून घेतली आहे; मात्र एफआयआर दाखल केला नाही. प्रकरणाची संवेदनशीलता पाहता वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे याची माहिती देण्यात आली असल्याचं पोलिसांनी सांगितलं. दरम्यान, एफआयआर दाखल केला नाही तर कोर्टात जाईन, असा इशारा प्रताप चंद्रा यांनी दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button