पक्ष विरोधी वर्तन, तनवाणी समर्थकांची भाजपमधून हाकलपट्टी

डॉ. कराड यांच्या घरावर झालेल्या दगडफेकीचा परीणाम

औरंगाबाद : शहर जिल्हा पदाधिकारी युवा माेर्चा अध्यक्ष सचिन झवेरी , अनुसूचीत जाती मोर्चा अध्यक्ष उत्तम अंभोरे, शहर चिटणीस रंगनाथ राठोड, पदाधिकारी संतोष सुरे यांची पक्ष विरोधी वर्तनामुळे भारतीय जनता पक्ष औरंगाबाद मधून तत्काळ हाकलपट्टी करण्यात येत आहे. असा मजकूर असणारे पत्र शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी शनिवारी (दि. २२) काढले.

डॉ. भागवत कराड यांच्या वाहनावर तनवाणी गटाचे सचिन झवेरी, संतोष सुरे व इतरांनी हल्ला केल्याचा आरोप भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड यांनी केला होता. कराड यांच्या घर आणि वाहनावर झालेल्या दगडफेकीनंतर भाजपा मधून तनवाणी समर्थकांची ही हाकलपट्टी करण्यात आली आहे.