आता दातखिळी बसली का? गोपीचंद पडळकरांना काँग्रेसचा सवाल

Maharashtra Today

मुंबई : देशभरासह राज्यात कोरोनाने (Corona) थैमान घातले आहे या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय लोकसेवा आयोगाने २७ जून रोजी होणारी नागरी सेवा प्राथमिक परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घोषित केला आहे. गुरुवारी याबाबत परिपत्रक काढण्यात आलं. आता ही परीक्षा १० ऑक्टोबर रोजी होणार असल्याचं यूपीएससीकडून सांगण्यात आले आहे. यावरुन काँग्रेस नेते भाई जगताप(Bhai-jagtap) यांनी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर(Gopichand-padalkar) यांच्यावर निशाणा साधला . एमपीएससी परीक्षा रद्द(MPSC Exam Cancel) झाल्यानंतर गोंधळ घालणारे आता कुठे आहेत? असा सवाल भाईंनी उपस्थित केला आहे .

राज्य सरकारने MPSC ची परीक्षा रद्द केली म्हणून रस्त्यावर लोळण घेऊन आंदोलन करणारे, केंद्र सरकारने UPSC ची परीक्षा रद्द केल्यावर आता हे महाराष्ट्र द्रोही कोणत्या बिळात जाऊन लपले आहेत, असा सवाल भाईंनी विचारला आहे. तसेच, आता दातखिळी बसली आहे का? असे म्हणत गोपीचंद पडळकर यांचे नाव न घेता महाराष्ट्रद्रोही असेही म्हटले .
गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारने एमपीएससीची परीक्षा रद्द केल्यानंतर पुण्यातील रस्त्यावर झोपून आंदोलन केले होते. त्यामुळे, विद्यार्थ्यांनीही या आंदोलनात मोठा सहभाग घेतला. त्यानंतर, एमपीएससीची परीक्षा रद्द करण्यात आली होती. आता, युपीएससीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे.