भारतविरोधी शक्तींनी काँग्रेसची बुद्धिच हॅक केली आहे : नकवी

Naqvi

नवी दिल्ली : काँग्रेसच्या बुद्धिला भारतविरोधी शक्तीने हॅक केले असून त्यामुळेच ते याप्रकारचे उपद्व्याप करत असल्याचा आरोप भाजप नेते मुख्तार अब्बास नकली यांनी केला. कपिल सिब्बल यांना यासाठीच तिथे पाठविले गेले असल्याचे ते म्हणाले. 2014 साली ईव्हीएम हॅक केल्याप्रकरणी शुजा या हॅकरने लंडन येथे घेतलेल्या पत्रपरिषदेतील आरोपांचे खंडन करताना ते बोलत होते.

भारतातील जनता याप्रकारचे आरोप सहन करत नसल्याचे सांगत नकवी म्हणाले, काँग्रेस प्रत्येक बाबतीत अयशस्वी ठरल्याने ते याप्रकारचे आरोप करत आहे. त्यांना कळून चुकले आहे कि पंतप्रधान मोदी समोर आपली डाळ शिजणार नाही. त्यामुळे ते याप्रकारचे बिनबुडाचे आरोप करत असल्याचे ते म्हणाले.

ABP TV sources