विरोधक ब्लॅक फंगस; राऊतांची भाजपावर टीका

Black Fungus - BJP - Sanjay Raut

पुणे :- करोना साथीच्या काळात मुंबईतील चांगल्या कामाची जागतिक आरोग्य संघटना, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासह अनेक जणांनी दखल घेतली. या कामाचे कौतुक केले आहे, मात्र विरोधक टीका करतात. कारण विरोधक ब्लॅक फंगस आहेत, अशी टीका शिवसेनेचे (Shiv Sena) नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली. कोरोनाचा (Corona) संसर्ग झालेल्या बालकांसाठी सुरू करण्यात आलेल्या सेंटरचे उद्घाटन संजय राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. ते म्हणालेत – कोरोनाचं बोट धरून आलेल्या ब्लॅक फंगस (Black Fungus) अर्थात म्युकरमायकोसिसने सर्वांची डोकेदुखी वाढवली आहे.

राऊत यांनी भाजपाला (BJP) ब्लॅक फंगसची उपमा दिली. संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, कोरोनाच्या महामारीत प्रत्येक ठिकाणी सरकार पोहचेल याची खात्री देता येत नाही. दुसऱ्या लाटेत सामाजिक संस्था असो की सर्वसामान्य व्यक्ती, झोकून देऊन काम करत आहेत. शहर आणि ग्रामीण भागात रुग्णालय उभारून रुग्णांना सेवा देणे ही मोठी राष्ट्रसेवा आहे.

ही बातमी पण वाचा : देशात फक्त पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्राचेच राज्यपाल खूप काम करतायत; संजय राऊतांचा टोला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button