
चंदीगड : केंद्राच्या कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी हरयाणात काही टोलनाक्यांचा ताबा घेतला. अंबाला-हिस्सार रोडवरील टोल नाका भारतीय किसान युनियनच्या शेतकऱ्यांनी ताब्यात घेतला आहे.
या संघटनेचे नेते मालकित सिंह आणि मनिष चौधरी यांनी हा टोल नाका बंद पाडला. टोल वसुल न करता वाहने सोडली जात आहेत. टोल वसुलीला शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. कर्नाल जिल्ह्यातील बस्तरा आणि पिओंट टोल नाकेही शेतकऱ्यांनी ताब्यात घेतले असून तेथेही टोल वसुली बंद करण्यात आली आहे.
पंजाबातील टोल नाकेही शेतकऱ्यांनी बंद पाडले आहेत. गेल्या ऑक्टोबर महिन्यापासून पंजाबातील २५ टोल नाके शेतकऱ्यांनी बंद पाडले. त्या ठिकाणची आत्तापर्यंत तीन कोटी रूपयांची टोल वसुली बुडाली आहे, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर दिल्लीकडे जाणारे रेल्वे मार्गही बंद पाडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला