सेक्स न करता १०० दिवस बिग बॉसमध्ये कशी राहशील?

bigg-boss-telugu-organisers

हैदराबाद : बिग बॉसच्या सेटवर सध्या वादग्रस्त प्रकार पाहायला मिळत आहे. बिग  बॉस शोमध्ये अभिनेत्री गायत्री गुप्ता सहभागी झाली आहे. गायत्रीला  बिग   बॉस समन्वयकाने आक्षेपार्ह प्रश्न विचारून सर्वांची झोप उडवली आहे.

सेक्स न करता १०० दिवस  बिग   बॉसमध्ये कशी राहशील, अशी विचारणा केल्याने गायत्रीने पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

ही बातमी पण वाचा : या सेक्सिस्ट समाजामध्ये ‘अभिनेत्रीं’नी राजकारणात येणं शाप आहे का? – स्पृहा जोशी संतापल्या

हा प्रकार तेलगू भाषेत हैदराबाद येथे सुरू असलेल्या बिग बॉसमध्ये घडला. भारतात विविध भाषांमध्ये लोकप्रिय शो  बिग   बॉस सध्या चांगलाच गाजत आहे. मराठी  बिग   बॉसमध्ये बिचकुले प्रकरणानंतर आता तेलगू भाषेतील बिग   बॉसमध्ये हा धक्कादायक प्रकार ऐकायला मिळत आहे.

या प्रकारासाठी अभिनेत्री गायत्री गुप्ताने  बिग  बॉस आयोजकांविरोधात हैदराबाद येथील बंजारा हिल्स पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. लैंगिक आरोपासाठी याआधीही  बिग   बॉस आयोजकांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

ही बातमी पण वाचा : हनुमान चालिसा कार्यक्रमात सहभागी झाल्याने भाजप नेत्या इशरत जहाँला धमकी