
ज्येष्ठ अभिनेते मनोज बाजपेयी आणि दिग्दर्शक नीरज पांडे (Neeraj Pandey) यांची जोडी पुन्हा एकदा वेब सीरिजसह परत येत आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी या मूळ मालिकेचे नाव ‘सीक्रेट्स ऑफ सिनौली- डिस्कवरी ऑफ द सेंचुरी’ आहे. या मालिकेच्या निर्मात्यांचा असा दावा आहे की ही मालिका भारताचा इतिहास एका नव्या दृष्टीकोनातून मांडेल. त्याचे दिग्दर्शन नीरज पांडे यांनी केले असून त्यात मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee) देशाचा इतिहास सांगण्याचे काम करतील.
मनोजने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये आपण ‘सीक्रेट्स ऑफ सिनौली- डिस्कवरी ऑफ द सेंचुरी’ या मालिकेचा भाग असल्याचे सांगितले आहे. त्याने पोस्टमध्ये लिहिले की, ‘भारताचा जुना इतिहास एका नव्या दृष्टीकोनातून पाहण्यासाठी मी ‘सिक्रेट्स ऑफ सीनौली – डिस्कव्हरी फ द सेंचुरी ‘सह पूर्ण तयार आहे.’ वास्तविक, हा एक उपक्रम आहे ज्यामध्ये देशातील वेगवेगळ्या गोष्टींबद्दल वेगळ्या दृष्टीकोनातून काही कथा सांगितल्या जातील.
हा उपक्रम १५ डिसेंबरपासून सुरू होईल. एका कथेचे नाव ‘मिशन फ्रंटलाइन’ असेल ज्यामध्ये तेलगू चित्रपटांचे प्रख्यात अभिनेता राणा डग्गुबती मुख्य भूमिकेत दिसतील. दुसऱ्या कथेचे शीर्षक असेल ‘लद्दाख वॉरियर्स- द संस ऑफ द सॉइल’, ज्यामध्ये रणदीप हूडा मुख्य भूमिकेत असेल. आणि तिसरी कथा ‘सीक्रेट्स ऑफ सिनौली- डिस्कवरी ऑफ द सेंचुरी’ असेल ज्यात मनोज बाजपेयी आणि नीरज पांडे यांचे योगदान आहे.
‘सीक्रेट्स ऑफ सिनौली- डिस्कवरी ऑफ द सेंचुरी’ चा भाग होण्यासाठी मनोज खूप खूष आहे. मनोज म्हणाला, ‘मला या कथेचा भाग होण्यात खूप आनंद झाला आहे कारण मला त्या माध्यमातून प्राचीन भारताबद्दल बरेच काही कळले. आमची सभ्यता सुमारे चार हजार वर्ष जुनी आहे आणि सिनौलीमधील पुरातत्व विभागाच्या शोधातून आम्हाला त्याबद्दल माहिती मिळाली. आम्हाला आमच्या इतिहासाबद्दल बरीच माहिती इथूनच मिळाली. मी प्राचीन भारताचा इतिहास एका नवीन दृष्टीकोनातून पहात आहे. ‘
मनोज आणि नीरज या प्रकल्पसह पाचव्यांदा एकत्र काम करत आहेत. यापूर्वी हे दोघेही ‘स्पेशल 26’, ‘नाम शबाना’, ‘सात उच्चके’ आणि ‘अय्यारी’ सिनेमांमध्ये एकत्र काम केले आहेत. मनोजबद्दल सांगायचे तर तो नुकताच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सूरज पे मंगल भारती’ चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसला. देशात लॉकडाऊन संपल्यानंतर चित्रपटगृह सुरू झाल्यावर हाच चित्रपट सर्वप्रथम सिनेमागृहात प्रदर्शित झाला. यामध्ये मनोजसोबत फातिमा सना शेख आणि दिलजीत दोसांझ यांच्या मुख्य भूमिका आहेत. चित्रपटाचा बॉक्स ऑफिसचा निकाल फारसा उत्साहवर्धक नव्हता.
View this post on Instagram
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला