
तिरुवअनंतपुरम : भारतीय हवामान खात्याने (Indian Meteorological Department) दक्षिण तामिळनाडू आणि दक्षिण केरळच्या किनारपट्टीवर दोन दिवसांत अजून एक वादळ धडकणार असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरात दक्षिण पश्चिमी भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. या कमी दाबाच्या पट्याचे काही तासांतच रुपांतर वादळात होण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान खात्याने ‘बंगालच्या उपसागरात दक्षिण पश्चिमी भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्याचे रुपांतर कधीही वादळात होऊ शकते. हा कमी दाबाचा पट्टा श्रीलंकेच्या त्रिनकोमाली पासून ५९० किमी अंतरावर आहे. पण हे वादळ पश्चिमेकडे सरकण्याची शक्यता आहे. असे वक्तव्य प्रसिद्ध केले आहे.
हवामान खात्याने ‘बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला हा कमी दाबाचा पट्टा गेल्या सहा तासांत ७ किमी वेगाने पश्चिमेकडे सरकत आहे. हे वादळ कन्याकुमारीपासून १००० किमी अंतरावर आहे.’ अशी माहिती दिली आहे. येत्या सहा ते बारा तासांत हा कमी दाबाचा पट्टा वादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने ‘हे वादळ उत्तर पश्चिमेकडे सरकण्याची शक्यता आहे. २ डिसेंबरच्या संध्याकाळी हे वादळ श्रीलंकेच्या त्रिनकोमाली येथे धडकेल. त्यानंतर ते पश्चिमेकडे जाण्याची शक्यता आहे. ३ डिसेंबरपर्यंत हे वादळ तामिळनाडूनच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला