आणखी एक स्टार किड बॉलिवुडमध्ये एंट्री करण्यास सज्ज

Shanaya Kapoor

सुशांत सिंहच्या मृत्यूनंतर (death of Sushant Singh) एकीकडे नेपोटिझमची चर्चा जोरदारपणे सुरु असतानाच आणखी एक स्टार किड बॉलिवुडमध्ये एंट्री करण्यास सज्ज झाली आहे. कंगना रनौत, रिचा चड्ढासह अनेक कलाकारांनी बॉलिवुडमध्ये नेपोटिझम (Nepotism in Bollywood) मोठ्या प्रमाणावर असून बाहेरील कलाकारांना काम मिळवण्यासाठी प्रचंड कष्ट करावे लागते असे जाहीरपणे सांगितले आहे. तर दुसरीकडे 2021 मध्ये काही स्टार किड्स रुपेरी पडद्यावर येण्यासाठी सज्ज झाल्याचे दिसून येत आहे. तसे पाहिले तर बॉलिवुडमध्ये प्रत्येक वर्षी एक डझनाच्या आसपास स्टार किड्स किंवा बॉलिवुड फॅमिलीतील तरुण-तरुणी रुपेरी पडद्यावर येतच असतात.

कपूर खानदानातील आणखी एक मुलगी 2021 मध्ये रुपेरी पडद्यावर येणार असून या मुलीचे नाव आहे शनाया कपूर (Shanaya Kapoor) . शनाया ही अनिल आणि बोनी कपूरचा भाऊ संजय कपूरची (Sanjay Kapoor) मुलगी आहे. गेल्या काही वर्षांपासून शनाया सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह आहे. पण तिने तिचे अकाउंट खाजगी ठेवल्याने अन्य लोकांना तिच्याशी फ्रेंडशीप करता येत नव्हती. पण शुक्रवारी शनायाने तिचे अकाउंट पब्लिक केले आणि केवळ काही तासातच तिच्या फॅन्सची संख्या हजारोत पोहोचली. शनायाचे 2017 पासून इन्स्टाग्राम अकाऊंट असून ते फक्त मित्रांसाठीच होते. शनायाने अकाऊंट सार्वजनिक करताच पिता संजय कपूरने शनायाचे सोशल मीडियावर स्वागत केले. संजय कपूरने लिहिले, ‘माझी मुलगी शनाया आता इन्स्टाग्राम वर आली आहे. कृपया तिला प्रेम द्या. यानंतर शनायाच्या फ़लोअर्सची संख्या जी 600 होती ती थेट 30 हजारांच्या वर पोहोचली. केवळ पिताच नव्हे तर शनायाच्या मैत्रीणी रिया कपूर, अर्जुन कपूर, खुशी कपूर, अनिल कपूर, अनन्या पांडेनेही तिचे स्वागत केले आहे.

शनाया कपूरने तिच्या अकाउंटवर एक फोटो शेअर करीत लिहिले आहे, ‘जीवनाचे एक पान पलटत आहे.’ तिचे अकाउंट सार्वजनिक होणे आणि तिने लिहिलेले वाक्य पाहून शनाया आता लवकरच रुपेरी पडद्यावर आगमन करणार असल्याचे म्हटले जात आहे. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत संजय कपूरनेही त्याची मुलगी लवकरच सिनेमात एंट्री करणार असल्याचे म्हटले होते.

शनाया बॉलिवुडमधील एका मोठ्या निर्मात्याच्या सिनेमातून रुपेरी पडद्यावर येणार असल्याचे सांगितले जात आहे. शनायासोबत नायक म्हणून नवा चेहरा लाँच केला जाणार असून शनायाचा हा सिनेमा एक अॅक्शनपॅक्ड संगीतमय लव्ह स्टोरी असेल असे सांगितले जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER