डीआरडीओने विकसित केली जगातील सर्वोत्तम ‘हॉवित्झर’ तोफ

बालासोर :  स्वदेशी बनावटीची ATAGS हॉवित्झर ही जगातील सर्वोत्तम तोफ आहे. ४८ किलोमीटर दूरच्या लक्ष्यावर प्रहार करण्याची या तोफेची क्षमता आहे, असे संरक्षण संशोधन विकास संस्थेच्या  (डीआरडीओ) वैज्ञानिकाने सांगितले.

आयात करण्याची गरज नाही

ओडिशातील बालासोर येथील चाचणी स्थळावर या तोफेची चाचणी घेण्यात आली. स्वदेशी बनावटीची ही तोफ भारतीय लष्कराच्या सर्व गरजा पूर्ण करू शकते. आता या तोफा आयात करण्याची गरज नाही, असे ATAGS हॉवित्झर तोफ प्रकल्पाचे संचालक आणि डीआरडीओचे वरिष्ठ वैज्ञानिक शैलेंद्र व्ही. गाडे यांनी फिल्ड चाचणी दरम्यान एएनआयला सांगितले. चीन सीमेजवळ सिक्कीम आणि पाकिस्तान सीमेजवळ पोखरण येथे चाचणी दरम्यान ATAGS हॉवित्झरमधून दोन हजार राऊंडस फायर करण्यात आले आहेत.

भारतीय लष्करात वापरात असलेली बोफोर्स आणि इस्रायलने जी ATHOS तोफ देण्याची तयारी दाखवली आहे, त्यापेक्षा स्वदेशी ATAGS हॉवित्झरमधील सिस्टिम अधिक चांगली आहे, असे गाडे म्हणाले. कारगिल युद्धात पाकिस्तानवरील विजयात बोफोर्स तोफांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. ATAGS हॉवित्झर ही डीआरडीओने विकसित केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER