प्रवीण दरेकरांच्या सुरक्षेत आणखी कपात; फक्त एकच हवालदार राहणार !

Praveen Darekar

मुंबई :  राज्यातील विरोधी पक्षातील नेते आणि दिग्गज व्यक्तींच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय अलीकडेच राज्य सरकारने जाहीर (MVA Goverment) केला आहे. भाजपाचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांच्या पोलीस सुरक्षेत पुन्हा मोठी कपात करण्यात आली आहे. त्यांना देण्यात आलेली ‘वाय’ सुरक्षा रद्द करण्यात आली असून आता  त्यांच्या सुरक्षेसाठी फक्त एकच हवालदार राहील.

राज्य सरकारच्या बैठकीत सत्ताधारी पक्षातील मंत्र्यांपासून ते विरोधी पक्षातील नेत्यांची सुरक्षा कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. भाजपाचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचीही सुरक्षा कमी करून वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली होती. हा निर्णय जाहीर झाल्यानंतर दरेकर यांच्या सुरक्षेत आणखी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरेकर यांची वाय सुरक्षा हटवण्यात आली आहे. आता दरेकर यांच्या सुरक्षेसाठी एकच पोलीस हवालदार दिमतीला असणार आहे.

त्याआधी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षा ताफ्यात देण्यात आलेली ‘बुलेटप्रूफ’ गाडी काढण्यात आली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याही सुरक्षा व्यवस्थेत मोठी कपात करण्यात आली. फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांचीही सुरक्षा कमी करण्यात आली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली होती. ती आता काढून घेण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER