कोरोनावरील आणखी एका स्वदेशी औषधाला परवानगी; डीआरडीओने बनवले औषध

DRDO

नवी दिल्ली : कोरोना (Corona Virus) संक्रमणाने रुग्णसंख्येत वेगाने वाढ होत आहे. अशातच शनिवारी एक दिलासादायक बातमी आली आहे. ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (Drugs Controller General of India) कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी आणखी एका औषधाला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे. भारत सरकारच्या औषध नियामक संस्थेने डीआरडीओने बनवलेल्या २ डेक्सोय डी ग्लुकोजच्या आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे. भारतातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. डीआरडीओने २ डेक्सोय डी ग्लुकोजचे उत्पादन मोठ्या प्रमाणात करता येईल, असा दावाही केला आहे. डीआरडीओनं याविषयी प्रसिद्धिपत्रक जारी केलं आहे.

कोरोनाबाधित रुग्णांवर केल्या जाणाऱ्या उपचार पद्धतीऐवजी २-डेक्सोय डी ग्लुकोजचा वापर पर्यायी उपचार पद्धती म्हणून केला जाईल. या औषधाची निर्मिती डीआरडीओच्या आयएमएस आणि डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज यांनी एकत्रितपणे केली आहे. त्याच्या उत्पादनाची जबाबदारी हैदराबाद येथील डॉ. रेड्डी लॅबोरेट्रीजला देण्यात आली आहे. हे औषध क्लिनिकल चाचणीत यशस्वी ठरलं आहे. या औषधाचा उपचार ज्या रुग्णांवर केला गेला त्यांच्यात वेगाने बरे होण्याचे प्रमाण दिसले. त्याचसोबत जे रुग्ण ऑक्सिजनवर निर्भर होते ते कमी झाले. या औषधाच्या वापरामुळे रुग्णांचा कोरोना रिपोर्ट इतर रुग्णांच्या तुलनेत लवकर निगेटिव्ह आला आहे.

म्हणजेच हे रुग्ण लवकर बरे होत आहेत, असंही डीआरडीओकडून सांगण्यात आलं आहे. डीआरडीओनं जारी केलेल्या माहितीनुसार २-डेक्सोय डी ग्लुकोजच्या रुग्णांना दिलं गेलं ते रुग्ण वेगानं रिकव्हर होतात. त्याचा बरा होण्याचा वेग नियमितपणे केल्या जाणाऱ्या उपचार पद्धतीपेक्षा चांगला असल्याचा दावा करण्यात आला आहे. नियमित उपचार पद्धतीनं रुग्ण बरा होण्यासाठी लागणारा वेळ आणि २-डेक्सोय डी ग्लुकोज दिलेले रुग्ण बरे होण्याचा वेळ यांच्यामध्ये जवळपास २.५ दिवसांचा फरक आढळून आल्याचं डीआरडीओकडून सांगण्यात आलं.

हे औषध पावडरच्या स्वरूपात दिलं जातं. जे पाण्यात मिसळून प्यायचं असतं. हे औषध संक्रमित कोशिकांमध्ये जमा होतं आणि व्हायरल सिंथेसिस आणि एनर्जी निर्माण करणाऱ्या व्हायरसला रोखतं. हे औषध खूप फायदेशीर ठरत आहे. त्यासोबतच रुग्णाच्या शरीरातील ऊर्जा वाढवण्याचंही काम करतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button