कोरोना संसर्गाने आणखी एका हाय कोर्ट न्यायाधीशाचे निधन

MP HC

इंदूर :  मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या (Madhya Pradesh High Court) इंदूर खंडपीठावरील न्यायाधीश वंदना कसरेकर (Justice Vandana Kasarekar) यांचे कोरोना संसर्गाने रविवारी सकाळी निधन झाले. त्या ६० वर्षांच्या होत्या. मूळच्या इंदूरच्याच असलेल्या न्या. कसरेकर यांनी तेथे २० वर्षांहून अधिक वकिली केल्यानंतर २५ आॅक्टोबर, २०१४ रोजी त्यांना इंदूर खंडपीठावर न्यायाधीश नेमण्यात आले होते.

या महामारीने निधन होणाऱ्या  न्या. कासरेकर या देशातील उच्च न्यायालयाच्या दुसऱ्या  न्यायाधीश आहेत. गेल्याच आठवड्यात गुजरात उच्च न्यायालयाचे न्यायाधीश  जी. आर. उधवानी यांचेही याच आजाराने निधन झाले. न्या. कसरेकर यांच्या निधनाने एक नि:स्पृह न्यायाधीश व त्याहूनही उत्तम माणूस गमावल्याची खंत वकील वर्गाने व्यक्त केली.

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी  दिवंगत न्यायमूर्तींना ट्विटरवर श्रद्धांजली वाहिली. ४२ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी न्या. आर. के. तनखा यांचे निधन झाले होते.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER