शरद पवारांकडून पुण्यासाठी आणखी भेट, सहा रुग्णवाहिकांचे लोकार्पण

Sharad Pawar

पुणे : कोरोनाची (Corona) दुसरी लाट येत आहे. त्यामुळे आपल्याला आणखी सजग आणि जागरुक राहण्याची तसेच आणखी साधन सामग्री उपलब्ध करून देण्याची गरज आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्त केले. पंचशील फाउंडेशन पुणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पुणे शहरासाठी काल सहा रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी शरद पवार बोलत होते.

शरद पवार म्हणाले, “रुग्णांना संकटातून बाहेर काढण्यासाठी या रुग्णवाहिकांचा चांगला वापर करता येईल. अमेरिका, इटली आणि स्पेनसारख्या देशात गेल्या आठ दिवसांत कोरोनाची दुसरी लाट आल्याचे बातम्यांमधून कळते आहे. त्यामुळे आपल्याला आणखी सजग आणि जागरुक राहण्याची तसेच आणखी साधन सामग्री उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. पंचशील फाउंडेशनच्या वतीने समाजोपयोगी कामे करण्यात येत आहेत. कोरोनाकाळात या संस्थेने आयसीयूचे बेड रुग्णालयांना उपलब्ध करून दिले. संस्थेचे काम कैातुकास्पद आहे. यावेळी आमदार सुनिल टिंगरे, अविनाश साऴवे, रविंद्र माळवदवकर उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER