डेव्हिड वॉर्नरचा आणखी एक अर्धशतक, आयपीएलमध्ये नवा इतिहास रचला आणि निघाला सर्वात पुढे

David Warner

सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने (David Warner) गुरुवारी पंजाबविरुद्ध अर्धशतक झळकावत एक नवीन विक्रम स्थापित केला. आता तो आयपीएलमध्ये (IPL 2020) पन्नास वेळा ५० किंवा त्याहून अधिक धावा करणारा एकमेव खेळाडू बनला आहे. वॉर्नरने आयपीएलमध्ये ४६ अर्धशतके आणि चार शतके केली आहेत.

वॉर्नरने १३२ डावात ही कामगिरी केली. वॉर्नरनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली आहे. विराटने १७४ डावात ४२ वेळा पन्नास पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. चेन्नई सुपर किंग्जचा खेळाडू सुरेश रैना आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा संयुक्त तिसर्‍या क्रमांकावर आहे. दोघांनीही १८९ डावात ३९ वेळा ५० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. चौथ्या क्रमांकावर, आरसीबीचा एबी डिव्हिलियर्स आहे, त्याने ३८ वेळा हा पराक्रम केला आहे.

याखेरीज वॉर्नरने पंजाबविरुद्ध सलग नवव्यांदा अर्धशतक ठोकले असून आता त्याने आयपीएलमध्ये पंजाब विरूद्ध सर्वाधिक ८७१ धावा केल्या आहेत.

दुबईमध्ये पंजाबविरुद्ध झालेल्या सामन्यात वॉर्नरने ४० चेंडूत ५२ धावा केले. यासह त्याने या मोसमात २०० धावाही पूर्ण केल्या. सर्वाधिक धावांच्या बाबतीत वॉर्नर सध्या पाचव्या स्थानावर आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER