अक्षय कुमार ‘बेल बॉटम’ चित्रपटाच्या चमूसह बनवणार आणखी एक चित्रपट

Another film to be made by Akshay Kumar with the cast of 'Bell Bottom'

बॉलिवूडचा अ‍ॅक्शन हिरो अक्षय कुमारने (Akshay Kumar) त्याच्या पुढच्या चित्रपटासाठी १०० कोटी रुपये फी मागितली आहे. त्याला ही रक्कम देण्यास निर्मात्यांनी मान्य केले आहे. बातमीनुसार अक्षय चित्रपटासाठी १०० कोटी शुल्क आकारू शकतो.

अक्षय कुमारचा नुकताच बनलेला ‘लक्ष्मी’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे आणि कोरोनामुळे चित्रपटांच्या रिलीज डेटमध्ये बदल झाल्यामुळे त्याचे बरेच चित्रपट अडकले आहेत. त्याचे अनेक चित्रपट सज्ज असून अनेक चित्रपट ऑन प्रोसेस आहेत.

अक्षयने नुकतेच ‘बेल बॉटम’ (Bell Bottom) चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले असून आता लवकरच तो ‘बेल बॉटम’ च्या टीमसह आणखी एक चित्रपट बनवणार असल्याचे बोलले जात आहे. मुदस्सर अली दिग्दर्शित आणि जॅकी भगनानी निर्मित हा विनोदी चित्रपट असणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

अक्षय कुमार ह्या फॅमिली कॉमेडीच्या कथेबद्दल आनंदी आहे. तसेच चित्रपटाचा फायनान्शियल अँगल पाहून अक्षय कुमारने त्यास सहमती दर्शविली आहे. असं म्हणतात की, अक्षय कुमार या चित्रपटासाठी सुमारे १०० कोटी रुपये डिमांड करत आहे. तर अक्षय कुमारची फी काढून घेतल्यानंतर या चित्रपटाचे बजेट ३५ ते ४५ कोटींचे सांगितले जात आहे. असं मानलं जातं आहे की अक्षय कुमारसाठी देखील हा एक चांगला व्यवसाय करार आहे, कारण चित्रपटाचे शूट फार काळ चालणार नाही आहे. शूटिंग ४५ दिवसात संपेल. अशा परिस्थितीत त्याला दररोजच्या शूटसाठी दोन कोटी रुपये मिळणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER