वर्षा बंगल्यावर आता आणखी एका कर्मचाऱ्याला लागण

COVID-19 Positive - Varsha

मुंबई :- राज्यात कोरोनाचे (Corona) संकट वाढतच चालले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यातील एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत अजून वाढ झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून वर्षा बंगल्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. येथे  एकामागोमाग एकाला कोरोनाची लागण होत आहे. नुकतीच मुख्यमंत्री कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे धोका आणखी वाढला आहे.

तर दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) आणि मुलगा आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हे दोघेही कोरोनाबाधित आहेत. सद्य:स्थितीत रश्मी ठाकरे एच. एन. रुग्णालयात दाखल आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button