कपूर खानदानातील आणखी एक मुलगी बॉलिवूडमध्ये, करण जोहर करणार लाँच, झाला ट्रोल

Maharashtra Today

बॉलिवुडमध्ये (Bollywood) वंशवाद नाही असे कितीही उच्चरवाने म्हटले जात असले तरी तुम्ही जर बॉलिवूडमध्ये कार्यरत असलेल्या मोठ्या परिवारातील असाल तर मात्र तुमचा बॉलिवूडमध्ये प्रवेश अत्यंत सुलभ होतो. आणि प्रख्यात निर्माता-दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) अशा स्टार किड्सनाच नायक-नायिका होण्याची सगळ्यात अगोदर संधी देतो. गेल्या काही वर्षात करण जोहरने आलिया भट्ट, अनन्या पांडेपासून वरुण धवन, जान्हवी कपूर, ईशान खट्टर या स्टारकिड्सना लाँच केलेले आहे. मात्र हाच करण जोहर बॉलिवूडमध्ये वंशवाद नाही असे म्हणतो. याच करण जोहरने आता कपूर खानदानातील आणखी एका मुलीला लाँच करणार असल्याचे घोषित केले आहे. याबाबत त्याने सोशल मीडियावर पोस्ट टाकली आहे. पण यूजर्सच्या विपरित कमेंट येण्याची भिती असल्याने त्याने त्याच्या अकाउंटरवर रिअॅक्शनचा ऑप्शनच बंद केला आहे. तरीही त्याच्यावर यूजर्स तुटून पडलेले आहेत. करणवर वंशवादाचा सगळ्यात पहिला आरोप कंगना रनौतने केला होता.

ही नवी मुलगी आहे शनाया कपूर.(shanaya kapoor) शनया ही अभिनेता संजय कपूर आणि महीप कपूर यांची मुलगी आहे. शनायाने करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन्सच्या सिनेमातून लाँच होणार असल्याची माहिती सोशल मिडियावर एक व्हीडियो शेअर करून दिली आहे. या व्हीडियोत शनाया खूपच सुंदर दिसत आहे. मात्र यूजर्स वंशवादाच्या मुद्द्यावरून तिलाही ट्रोल करू लागले आहेत. काही जणांनी तर नेपोटिझम इन बॉलिवूड (Nepotism in Bollywood) हॅशटॅगही वापरण्यास सुरुवात केली आहे.

करण जोहरने शनायाबाबत व्हीडियो शेअर केला असून त्यात त्याने म्हटले आहे, ‘आमच्या कुटुंबात आणखी एक सुंदर सदस्य जोडला गेला आहे. डीसीए स्क्वॉडमध्ये तुझे स्वागत आहे शनाया कपूर. तिचा उत्साह आणि मेहनत कमालाची आहे. आमच्यासोबत येत असल्याने तिच्यावर तुमचे प्रेम आणि आशीर्वादाचा वर्षाव करा. कारण ती तिचा पहिला सिनेमा धर्मा प्रॉडक्शन्ससोबत जुलैपासून सुरु करणार आहे.’ यामुळे करण प्रचंड ट्रोल होऊ लागला आहे. नायिका बनण्यापूर्वी शनायाने जान्हवी कपूरचा ‘गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल’मध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. शनायानंतर करण जोहर लवकरच श्रीदेवीची दुसरी मुलगी आणि जान्हवी कपूरची छोटी बहिण खुशी कपूर आणि शाहरुख खानची मुलगी सुहाना खानलाही लाँच करणार असल्याचे म्हटले जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER