कोल्हापूरात सापडला अजून एक कोरोना रुग्ण

कोल्हापूर :- शाहूवाडी तालुक्यातील एक तीस वर्षीय युवक कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे गुरुवारी सकाळी स्पष्ट झाले . शाहूवाडी तालुक्यातील हा पहिला रूग्ण असून जिल्ह्यात पाचवा आहे. यामुळे आता कोल्हापुरात चिंता वाढली आहे. जिल्हा वैद्यकीय पथक येथील परिसरात रवाना झाले असून या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या अन्य व्यक्तींचा शोध सुरु आहे. मलकापूर पासून पावनखिंडीतकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक किलोमीटर अंतरावर उचलत या गावात हा पॉझिटिव्ह रूग्ण सापडाला आहे. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या दिल्लीतील कार्यक्रमासाठी गेला होता, अशी माहिती आहे.