भाजपला आणखी एक धक्का, घटक पक्षाचा नेता शरद पवारांना भेटला

sharad pawar & Mahadev Jankar

मुंबई :- शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारने (maha vikas aghadi government) भाजपला (BJP) जोरदार हादरा दिला. या धक्क्यातून भाजप सावरत नाही तेच आता एका मित्र पक्षाने झटका दिला आहे. भाजपच्या घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची गुप्त भेट घेतली आहे.

महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी पुण्यात शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीच्या 3 डिसेंबर रोजी ही भेट झाल्याची माहिती समोर आली आहे. पुण्याजवळील व्हिएसआय इनस्टिट्युटमध्ये महादेव जानकर यांनी शरद पवार यांची भेट घेतील. दोन्ही नेत्यामुळे बऱ्याच वेळ चर्चा झाली. मात्र, ही भेट कशासाठी होती आणि चर्चेचा तपशील काय होता, याची माहिती अद्याप समोर येऊ शकली नाही.

विशेष म्हणजे, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपचे अनेक आमदार आणि नेते राष्ट्रवादीच्या संपर्कात आहे असा दावा केला होता. नुकतेच एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात भाजपला खिंडार पडले आहे. पदवीधर निवडणुकीमध्येही भाजपमध्ये बंडखोरी उफाळून आली होती.

बीडमध्ये भाजपचे माजी खासदार आणि राज्यमंत्री जयसिंग गायकवाड (Jaysingh Gaikwad) यांनी जाहीरपणे भाजपवर नाराजी व्यक्त करत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. राज्यात आता मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. धनगर समाजाचे प्रमुख नेते असलेले महादेव जानकर यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

ही बातमी पण वाचा : शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ८० हजार बेरोजगारांना मिळणार नोकऱ्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER