ममता बॅनर्जींना आणखी एक झटका! डावे – काँग्रेस आघाडीकरून लढणार निवडणूक

Mamata Banerjee

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये लवकरच होणार असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीआधी तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी मोठे राजकीय धक्के बसत आहेत. मागील काही दिवसांमध्ये अनेक दिग्गज नेत्यांनी पक्ष सोडला. आता डाव्या पक्षांनी देखील ममता बॅनर्जींविरोधात दंड थोपटले आहेत. काँग्रेस आणि डावे आघाडी करून निवडणूक लढणार आहेत.

पश्चिम बंगालला धार्मिक ध्रुवीकरणापासून वाचवण्यासाठी आम्ही भाजपा व टीएमसीविरोधात मिळून निवडणूक लढवू. आमच्यात (काँग्रेस व डावी आघाडी) काहीही गैरसमज नाहीत. जागा वाटपांवर अद्याप चर्चा बाकी आहे. असे डाव्या आघाडीचे अध्यक्ष बिमेन बोस यांनी सांगितले.

ममता बॅनर्जी यांनी भाजपाविरोधात लढण्यासाठी काँग्रेस व डाव्या पक्षांकडे मदत मागितली होती. मात्र, दोघांनी यासाठी स्पष्टपणे नकार दर्शवला होता. काँग्रेसच्या एक नेत्याने ममता बॅनर्जींना आघाडी करण्यापेक्षा टीएमसीचे काँग्रेसमध्ये विलणीकरण करण्याचाही सल्ला दिला होता. आता डाव्या पक्षांनी देखील त्यांची भूमिका स्पष्ट केल्याने, ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER