ठाकरे सरकारचा कंगनाला आणखी एक दणका; ड्रग्ज प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडे

Kangana Ranaut - Uddhav Thackeray

मुंबई : मुंबईची (Mumbai) पाकव्याप्त काश्मीरशी तुलना आणि ऑफिसमधील अनधिकृत बांधकामावर हातोडा पडल्यानंतर अभिनेत्री कंगना रणौतच्या (Kangana Ranaut) अडचणींत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. अमलीपदार्थ प्रकरणी चौकशी होण्याची शक्यता आहे. कंगना रणौतकडून अमलीपदार्थांचा वापर करण्यात आल्याचा आरोप असून या प्रकरणी महाराष्ट्र सरकारने मुंबई पोलिसांना (Mumbai Police) अधिकृत पत्र पाठवलं. तपास करण्याचा आदेश दिला आहे.

आमदार सुनील प्रभू (Sunil Prabhu) आणि प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी दाखल केलेल्या विनंतीवर विधानसभेत उत्तर देताना सांगितलं की, कंगना रणौत आणि अध्ययन सुमन यांच्यात संबंध होते. अध्ययन सुमननं एका मुलाखतीत कंगना ड्रग्ज घेत असून आपल्यावरही जबरदस्ती केली होती, असं सांगितलं होतं. या प्रकरणाचा तपास आता मुंबई पोलीस करणार आहेत; मात्र कोणता अधिकारी तपास करणार हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयाने कंगनाची डोकेदुखी वाढण्याची दाट शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER