फडणवीसांचा आणखी एक दणका; अशोक चव्हाणांवरसुद्धा हक्कभंग आणणार!

Ashok Chavan-Devendra Fadnavis

मुंबई :- अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आक्रमक बाजू मांडली. त्यांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारला चांगलेच धारेवर धरले. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात हक्कभंग सादर केल्यानंतर आता काँग्रेसचे मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्याविरोधातसुद्धा हक्कभंग आणणार, अशी घोषणा केली आहे. अशोक चव्हाण यांनी आज सभागृहात मराठा आरक्षणाबाबत चुकीचे विधान केले. १०२ ची घटनादुरुस्ती मराठा आरक्षण कायद्याला लागू होत नाही. अ‍ॅटर्नी जनरलसंदर्भातील वक्तव्य चुकीचे आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात हक्कभंग दाखल करणार, असे फडणवीसांनी जाहीर केले.

“मुकुल रोहतगींनी सांगितल्यानुसार त्यांना अ‍ॅटर्नी जनरलनी पाठिंबा दिला. त्यांच्याविरोधात चुकीची माहिती अशोक चव्हाण यांनी दिली. सरकारच्या काळात केलेला कायदा कसा निरस्त आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न सरकार करत आहे, असे फडणवीस म्हणाले. सचिन वझे शिवसेनेत होते. कोर्टाचा निर्णय डावलून त्यांना वेगवेगळी कामे करण्यासाठी सेवेत घेतले.

मुंबईत जी स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली होती, त्यावेळी एका इनोव्हा गाडीचा वापर करण्यात आला. मंगळवारी सायंकाळपर्यंत इनोव्हा गाडी मुंबईतच होती. ज्याला तपास प्रक्रिया माहीत होती, त्यांनी प्लॅनिंगनुसार हत्या केली आहे. नि:पक्ष चौकशी झाल्यास सरकारमधील मोठी नावे समोर येतील, म्हणून ते चौकशी करणार नाहीत, असा आरोपही फडणवीसांनी केला.

ही बातमी पण वाचा : फडणवीस यांनी गृहमंत्र्यांविरोधात आणला हक्कभंग!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER