भाजपला धक्का ; शिवसेनेशी हातमिळवणी करून नगरसेवकाने मिळवलं सभापती पद

भाजपला धक्का - शिवसेनेशी हातमिळवणी करून नगरसेवकाने मिळवलं सभापती पद

मुंबई :- उल्हासनगर महापलिकेत (Ulhasnagar Municipal Corporation) जपच्या नगरसेवकाने पक्षालाच धोका देत शिवसेनेच्या मदतीने स्वतःच्या गळ्यात स्थायी समितीच्या सभापतीपदाची माळ गळ्यात घालून घेतली त्यामुळे राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

उल्हासनगर महापालिकेत गुरुवारी ऑनलाईन महासभेत ही निवडणूक पार पडली. भाजप नगरसेवक असलेल्या आणि पक्षाशी बंडखोरी केलेल्या विजय पाटील यांना 8 तर भाजपाच्या अधिकृत उमेदवार जया माखीजा यांना 7 मते मिळाल्याने भाजप (BJP) बंडखोर पाटील यांचा विजय झाला.

शिवसेनेने (Shiv Sena) केलेल्या राजकीय खेळीमुळे महापालिकेत बहुमत असलेल्या भाजपच्या हातून वर्षभराच्या काळात महापौर पदानंतर स्थायी समिती पदही गमावण्याची नामुष्की आली आहे. तर चारही प्रभाग समित्यांवर महिला राज आले असून भाजपाच्या वाट्याला तीन तर काँग्रेसच्या वाट्याला एक प्रभाग समिती आली आहे. एकूण 16 सदस्य असलेल्या या समितीत भाजपाचे 9 तर शिवसेना आणि काँग्रेस, रिपाई मित्र पक्षाचे मिळून 7 सदस्य होते.

त्यामुळे भाजपला या निवडणुकीत विजयाचा आत्मविश्वास होता. मात्र सभापती पदासाठी भाजपकडून दोन सदस्यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. मात्र याचवेळी भाजपचे नगरसेवक विजय पाटील यांनी पक्षांशी बंडखोरी करत शिवसेनेच्या पाठिंब्याने स्थायी समिती सभापती पदासाठी अर्ज दाखल केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER