रत्नागिरी जिल्ह्यात आणखी 40 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

राजापुरातील वैद्यकीय अधिकारीदेखील कोरोनाच्या विळख्यात

CoVID-19

रत्नागिरी/प्रतिनिधी : रत्नागिरी जिल्ह्यात 40 नवे कोरोना रुग्ण आढळले असून आता जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या आकडयाने 750 चा टप्पा गाठला आहे. आजच्या पॉझिटिव्ह अहवालात राजापूर ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्याचा आणि रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातील आणखी 3 कर्मचाऱ्यांचादेखील समावेश आहे.

ही बातमी पण वाचा : काेराेनाने घेतला योध्याचा बळी, आंजर्ले येथील आरोग्य सेवकाचा मृत्यू

आजच्या अहवालात कामथे येथील 14, रत्नागिरीतील 8, कळंबने 8, राजापूर 2, कळंबणी 7 आणि दापोली तालुक्यातील 1 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. जिल्हा रुग्णालयातील आणखी तिघा कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. याशिवाय काल पॉझिटिव्ह सापडलेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या तिघाजणांना कोरोनाची लागण झाली आहे. राजेंद्र नगर, श्रीराम नगर, सन्मित्र नगर, मच्छी मार्केट या भागात नवे रुग्ण आढळले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER