कोल्हापुरात लसीचे आणखी ३१,५०० डोस

Corona Vaccine Kolhapur

कोल्हापूर :- जिल्ह्यात लसीचे आणखी ३१ हजार ५०० डोस (31500  Doses) दाखल झाले आहेत. त्यामुळे पहिल्या टप्प्यात नोंदणी केलेल्या सर्वांना लस दिली जाणार आहे. लसीकरणासाठी केंद्र आणि कालावधी वाढविण्यात आला आहे. जिल्ह्यात आता २० केंद्रांवर आठवड्यातून पाच दिवस लसीकरण होणार आहे.

जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू झाले. यानंतर आठवड्यातून चार दिवस लसीकरण करण्यात आले. आता ते रविवार व मंगळवार वगळता पाच दिवस करण्यात येणार आहे. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण कोरोना (Corona) प्रतिबंधक म्हणून जिल्ह्यात देण्यात येणारी ‘कोविशिल्ड’ (Covidsheild) ही लस अत्यंत सुरक्षित आहे. ही लस मी घेतली आहे. कोरोना प्रतिबंधासाठी ही लस घेणे गरजेचे आहे. त्यामुळे सर्व डॉक्टर, परिचारिकांनी ती घ्यावी, त्यासाठी पुढे यावे, असे  डॉ. योगेश साळे, जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी केले.

१४ फेबुरुवारीपर्यंत आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण केले जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात महसूल आणि पोलीस दलातील कर्मचाऱ्यांचे लसीकरण होणार आहे. ३१ जानेवारीपर्यंत या दोन्ही विभागांतील कर्मचारी, अधिकाऱ्यांची नोंदणी पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महसूल विभागील १ हजार ५६७ जणांची नोंदणी झाली आहे.

दिवसभरात ७१० जणांनी लस घेतली. सोमवारी दिवसभरात जिल्ह्यातील गारगोटी व राधानगरी या दोन नव्या केंदांसह एकूण १३ केंद्रांवर ७१० जणांनी लस घेतली. बुधवारपासून शनिवारपर्यंत ते नियमितपणे सुरू राहणार आहे. आजअखेर ४ हजार ५७८ जणांचे लसीकरण झाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER