रत्नागिरी जिल्ह्यात आणखी १४ पॉझिटिव्ह

Ratnagiri - Coronavirus

रत्नागिरी : आज सकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात १४ नवीन रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले आहेत. त्यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७१० झाली आहे. जिल्ह्यात सध्या विविध रुग्णालयांत २०७ रुग्ण दाखल आहेत. काल सायंकाळपासून पॉझिटिव्ह रुग्णांना जिल्हा कोविड रुग्णालयात सहा रुग्ण, उपजिल्हा रुग्णालय, कामथे- सहा रुग्ण, उपजिल्हा रुग्णालय कळबणी-दोन रुग्ण संबंधित रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहेत. आज दाभोळ, ता. दापोली येथील एका रुग्णाचा मृत्यू झाला. रुग्णाचे वय ६० वर्षे होते. रुग्णाला मधुमेह, ब्लडप्रेशर तसेच एकदा हृदयविकारचा झटका येऊन गेला होता. रुग्णाचा मृत्यू रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी झाला होता. त्याचे स्वॅब तपासणी पाठविण्यात आले होते. स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या २७ झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER