मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन; बॉम्बशोधक पथक दाखल

Anonymous phone call to bomb the ministry

मुंबई :- मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन आल्याने खळबळ उडाली आहे. मंत्रालयाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षात सकाळी फोन आला. या फोनवरून मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणा वाढविण्यात आली आहे.

सध्या मंत्रालयात सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली असून बॉम्बशोधक व नाशक पथक मंत्रालयात दाखल झालं आहे.

माहितीनुसार, तासाभरापूर्वी धमकीचा निनावी फोन मंत्रालयाला आला होता. एक संशयित वस्तू मंत्रालय परिसरात ठेवण्यात आल्याचं त्या फोनवरून सांगण्यात आलं होतं, अशी माहिती मिळत आहे. त्यानुसार बॉम्बशोधक पथक आणि मुंबई पोलिसांचे (Mumbai Police) पथक या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button