दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राची वार्षिक सभा संपन्न

Annual meeting of South Central Region Cultural Center held

दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या नियामक मंडळाची वार्षिक सभा राज्यपाल तसेच केंद्राचे अध्यक्ष भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली डिजिटल माधमातून संपन्न झाली. यावेळी केंद्राचे सांस्कृतिक कार्यक्रम, २०१८-१९ वर्षासाठी वार्षिक लेखे व प्रशासकीय बाबींवर चर्चा झाली.

दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्राच्या परिक्षेत्रात आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश तेलंगणा, छत्तीसगड व महाराष्ट्र ही राज्ये येतात. केंद्राच्या माध्यमातून लोककला, आदिवासी कला, ललित कला व हस्तकलेच्या प्रसार व संवर्धनासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER