‘स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या’ बायोपिकची घोषणा

Maharashtra Today

मुंबई : भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात मोलाचे योगदान देणारे विनायक दामोदर सावरकर(Swatantryaveer Savarkar) यांच्या १३८ व्या जयंती निमित्ताने बॉलिवूडचे चित्रपट निर्माते संदीप सिंह(Sandeep Singh) यांनी सावरकरांच्या बायोपीकची घोषणा केली. या सिनेमाचं दिग्दर्शन महेश मांजरेकर करणार आहेत.

संदीप सिंह यांनी सिनेमाचा फर्स्ट लूक त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. “स्वातंत्र्याच्या इतिहासाची पूर्ण गोष्ट जाणून घेणे अजून बाकी आहे. वीर सावरकरांना लवकरच भेटा.”असे कॅप्शन त्यांनी फोटोला दिले आहे.
संदीप म्हणाले, “एकीकडे सावकरांचा आदर केला जातो तर दुसरीकडे त्यांच्यावर टीका होते. मला वाटते त्यांच्याबद्दल लोकांना फारसे माहीत नसल्याने असे होते. ते स्वातंत्र्य लढ्याचा महत्वाचा भाग होते ही गोष्टी कुणीही नाकारू शकत नाही. त्यांच्या आयुष्यात आणि प्रवासात डोकावण्याचा आमचा हा प्रयत्न आहे.”

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ सिनेमाची कथा ऋषि विरमानी आणि महेश मांजरेकर यांनी लिहली आहे. कलाकारांची घोषणा अजून करण्यात आली नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sandeep Singh (@officialsandipssingh)