खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमती जाहीर

kharif crops

नवी दिल्ली : यंदाच्या वर्षी २०२०-२१साठी खरीप पिकाच्या किमान आधारभूत किंमती (एमएसपी) सरकारने जाहीर केल्या. केंद्र सरकारने विविध धान्यांसाठी आणि पिकांसाठी एमएसपी म्हणजेच किमान आधारभूत किमती ठरवलेल्या आहेत. दरवर्षी या किमतींमध्ये बदल केला जातो. बाजार समितीने प्रतिक्विंटल दरपत्रक जाहीर केले. नव्या एमएसपीमुळे भात १८६८ तर ज्वारी २६२०, भूईमूग ५२७५, सोयाबीन ३८८० रुपये प्रतिक्विंटल दर मिळणार आहे.

किमान आधारभूत किंमत धोरणाद्वारे शेतकऱ्यांना किमान पन्नास टक्के नफ्याची हमी देण्यात आली आहे. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल मानले जाते. किमान आधारभूत किमतीमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या कृषी उत्पादनाला दराची हमी मिळते. देशभरात याची अंमलबजावणी करण्यात येते. यामुळे शेतकऱ्यांना मदत होण्याबरोबरच बाजारपेठेत किंमती स्थिर राहतात आणि पर्यायाने ग्राहकांनाही मदत होणार आहे.

नव्या एमएसपी प्रमाणे धान्यपिकांची किमान प्रतिक्विंटल खरेदी पुढील प्रमाणे असेल (कंसात प्रतिक्विंटल रुपये किंमत) तांदूळ(१८६८), तांदूळ (ग्रेड ए) (१८८८), ज्वारी (हायब्रीड)(२६२०),ज्वारी (मालदांडी) (२६४०), बाजरी ( २१५०), नाचणी (३२९५), मका (१८५०), तूर (६०००), मुग ( ७१९६), उडीद (६०००), भुईमूग (५२७५), सुर्यफुल (५८८५), सोयाबीन ( ३८८०), तिळ (६८५५), कारळा (६६९५), कापूस (मध्यम धागा) (५५१५), कापूस (लांबा धागा)(५८२५).

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER