इमारत दुर्घटनेत मृतांच्या कुटुंबीयांना मदत जाहीर; ठाकरे सरकारची घोषणा

Aid to families of those killed in building accident - maharashtra Today

मुंबई :- मालाड मालवणी भागात चार मजली इमारत कोसळून ११ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ७ जण जखमी झाले आहेत. मुसळधार पावसामुळे ही इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना सरकारकडून मदत जाहीर करण्यात आली आहे.

अपघातग्रस्तांचा कुटुंबीयांना पाच लाख रुपये देण्याची तसेच जखमींच्या उपचारांचा खर्च करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली. त्यांनी रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. यावेळी पालकमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, महापौर किशोरी पेडणेकर, जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर हे उपस्थित होते.

पेडणेकरांची प्रतिक्रिया
इमारत कोसळलेल्या अपघातग्रस्तांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत देण्यात येईल. अपघात निधीतून ही मदत केली जाणार आहे. रुग्णालयात जखमींना दाखल केले असून त्यांना मोफत उपचार देण्यात येणार आहे, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकरांनी (Kishori Pednekar) दिली आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button