मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वार्षिक पुरस्कारांची घोषणा

Announcement of the annual awards
  • कृ. पां. सामक जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ जोशी यांना जाहीर राज्यस्तरीय पुरस्कारासाठी किरण तारे, सिद्धार्थ गोदाम यांची निवड चंदन शिरवाळे यांनाही उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार

मुंबई : मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे माजी अध्यक्ष तसेच विख्यात लेखक चित्रकार आणि ४० वर्षे राजकीय पत्रकारितेची उत्तुंग शिखरे गाजवणारे ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ जोशी यांना २०२० चा मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघाचा कृ.पां. सामक जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.  प्रकाश बाळ जोशी यांनी १९७२ साली पत्रकारितेला केसरीतून सुरुवात केली. सकाळ, फ्री प्रेस जर्नल, इंडियन एक्प्रेस, द डेली आदी  मराठी व प्रामुख्याने इंग्रजी वर्तमानपत्रांबरोबरच २५ वर्षे टाइम्स ऑफ इंडियामध्ये ज्येष्ठ राजकीय वार्ताहर व विश्लेषक म्हणून कामगिरी बजावली.

१० वर्षांपूर्वी टाइम्स ऑफ इंडियामधून निवृत्ती घेतल्यावर त्यांनी चित्रकार म्हणून एका नवीन इंनीन्ग्जला सुरुवात केली आणि त्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर लौकिक कमावला. “प्रकाश बाळ जोशी यांच्या कथा” या कथासंग्रहास राज्य शासनाचा उत्कृष्ट साहित्याचा यशवंतराव चव्हाण पुरस्कार मिळाला आहे. या कथासंग्रहाचे इंग्रजीत “Mirror in the Hall” नावाने भाषांतर झाले आहे. गुजराती, हिंदी, फ्रेंच आणि मल्याळम आवृत्ती प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. पत्रकारितेत कार्यरत असताना पत्रकारांच्या न्याय्य हक्कांसाठी त्यांनी अनेक लढ्यांमध्ये सहभाग नोंदविला आहे. मुंबई युनियन ऑफ जर्नालिस्ट्स, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघ, अखिल भारतीय श्रमिक पत्रकार संघ आदी संघटनांवर त्यांनी अध्यक्ष, कार्यवाह अशा महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.

याशिवाय राज्यस्तरीय वृत्तपत्र प्रतिनिधीसाठी देण्यात येणारा पत्रकारिता पुरस्कार किरण तारे (इंडिया टुडे) यांना जाहीर झाला असून राज्यस्तरीय इलेक्ट्रॉनिक माध्यम प्रतिनिधी पुरस्कार सिद्धार्थ गोदाम (न्यूज १८ लोकमत, औरंगाबाद) यांना जाहीर झाला आहे. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या सदस्यांसाठी असणारा उत्कृष्ट  पत्रकारिता पुरस्कार चंदन शिरवाळे (पुढारी ,मुंबई) यांना जाहीर झाला आहे. पुरस्कार निवड समितीचे प्रमुख म्हणून  प्रकाश सावंत, सदस्य इंद्रकुमार जैन व सदस्य सचिव म्हणून  सचिन गडहिरे यांनी काम केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER