पश्चिम बंगालच्या विधानसभेत ‘जय श्रीराम’च्या घोषणा

Announcement of 'Jai Shriram' in the West Bengal Legislative Assembly

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) विधानसभेत बजेटवर (Bengal Legislative Assembly)भाषण देत होत्या, तेव्हा भाजपा आमदारांनी ‘जय श्रीराम’च्या (‘Jai Shriram) घोषणा दिल्या. बंगालमध्ये गेल्या काही वर्षात अनेक सार्वजनिक कार्यक्रमात आणि रस्त्यावर होत असलेली जय श्रीराम घोषणा आता विधानसभेतही पोहचली आहे.

यामुळे ममता बॅनर्जी नाराज झाल्या आणि त्यांनी ”मी आजपर्यंत कधीच बजेट दरम्यान अशाप्रकारची घोषणाबाजी पाहिली नाही.भाजपाला बजेटवर चर्चा नकोच आहे,” अशी टीका केली.

ममता बॅनर्जी आणि पश्चिम बंगालच्या राज्यपालांमध्ये मतभेद आहे. विधानसभेच्या सत्राच्या पहिल्या दिवशी राज्यपालांना बोलावण्यात आले नव्हते! यामुळे आमदार नाराज होते. या मुद्द्यावर काँग्रेस व डाव्या पक्षांच्या आमदारांनीही बजट सत्रावर बहिष्कार टाकला. या सर्व गोंधळामुळे बजेट सादर करण्याला उशीर झाला.

या आधी २३ जानेवारी रोजी व्हिक्टोरिया मेमोरिअलमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती दिनी आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत देखील, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जय श्रीरामच्या घोषणांमुळे भडकल्या होत्या. त्यांनी भाषण करण्यास नकार देत, नाराजी व्यक्त केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER