नाशिक दुर्घटनेच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समितीची घोषणा, दोषींवर कारवाई होणार

Rajesh Tope - Nashik

नाशिक :- नाशिक महापालिकेच्या (Nashik Municipal Corporation) झाकिर हुसेन रुग्णालयात (Zakir Hussain Hospital) आज दुपारी झालेल्या दुर्दैवी दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने सात सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समितीची घोषणा केली आहे. याबाबतची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली. ही समिती झालेल्या दुर्घटनेची सखोल चौकशी करेल आणि त्यांनी केलेल्या सूचना दिशानिर्देश म्हणून अमलात आणल्या जातील, असे स्पष्टीकरणही टोपे यांनी केले. या चौकशी समितीचा अहवाल मिळाल्यानंतर जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असंही टोपे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. आज राजेश टोपे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी रुग्णालयाची पाहणी केली. त्यानंतर ते बोलत होते.

ही बातमी पण वाचा : नाशिकनंतर आता अंबाजोगाईत ऑक्सिजनचा अभाव; ५ रुग्णांचा मृत्यू; नातेवाईकांचा रुग्णालयावर आरोप

यावेळी ते म्हणाले की, नाशिकची दुर्घटना अत्यंत दुःखदायी आहे. या घटनेच्या चौकशीसाठी सात सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समितीची नियुक्ती केल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती घटनेची चौकशी करेल. या समितीमध्ये वैद्यकीय अधिकारी, तांत्रिक दोष निर्माण झाल्यामुळे तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य, महापालिकेचे अभियंता आणि ऑक्सिजन प्लांट उभारणीचं काम करणाऱ्या लोकांचा समावेश असेल, असं टोपेंनी सांगितलं.

या दुर्घटनेनंतर आता ऑक्सिजन लिक्विड टँकमध्ये किती साठा आहे, किती प्रेशर आहे याची व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर २४ तास सुरक्षा रक्षक नेमण्याची गरज आणि स्वतंत्र मेंटेनन्ससाठी व्यक्ती नेमावा लागणार असल्याचं टोपे यांनी सांगितलं. त्याचबरोबर या दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी दिशानिर्देश ठरवले जाईल. चौकशी समितीकडून मिळालेल्या सूचना दिशानिर्देश म्हणून अमलात आणू. तसेच मृतांच्या नातेवाइकांना सरकारकडून प्रत्येकी पाच लाख तर महापालिकेकडून पाच लाखांची मदत दिली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

ही बातमी पण वाचा : नाशिकची दुर्घटना संपूर्ण महाराष्ट्रावर आघात, विरोधकांनी राजकारण करु नये – मुख्यमंत्री

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button