महामंडळ, एसईओ पदांच्या नियुक्त्या जाहीर करा; नाना पटोलेंना माजी सचिवाचे निवेदन

Dhananjay Junnarkar - Nana Patole - Maharashtra Today

मुंबई : महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi) सत्तेत येऊन एक वर्ष झाले. मात्र, महामंडळ व एसईओच्या नियुक्त्या झाल्या नाहीत. नियुक्त्या त्वरित करण्यात याव्यात, यासाठी काँग्रेसचे (Congress) माजी सचिव धनंजय जुन्नरकर (Dhananjay Junnarkar) यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांना निवेदन दिले आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) हे पदावर असेपर्यंत १२ आमदारांच्या पत्रावर सही करतील असे वाटत नाही, असे जुन्नरकर यांनी म्हटले आहे. सध्या राज्यपाल आणि महाविकास आघाडी सरकारचे संबंध पाहता तिन्ही पक्षांनी शिफारस केलेल्या नेत्यांची वर्णी सहजासहजी लागणे दुरापास्त वाटत आहे. पत्र देऊनसुद्धा एक वर्षापासून पद रिक्त आहे. महाराष्ट्रात तीन पक्षांची सत्ता आहे. यात काँग्रेसला सर्वांत कमी वाटा मिळालेला आहे. येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीआधी कार्यकर्त्यांना न्याय मिळणे गरजेचे आहे.

राज्यपाल नियुक्त १२ आमदारांसाठी ज्यांची नावे गेली आहेत, त्या नावांना महामंडळात सामील करून घेतल्यास अन्याय होणार नाही. महाराष्ट्र शासनाकडे ४० महामंडळे आहेत. यात ३५० ते ४०० वरिष्ठ पदाधिकारी आणि एसईओच्या माध्यमातून हजारो कार्यकर्त्यांना न्याय मिळेल, असा विश्वास जुन्नरकर यांनी व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER