मोदींचे आपत्ती धोरण आणि व्यवस्थापन पोकळ; नाना पटोलेंची केंद्रावर टीका

Nana Patole - PM Narendra Modi

मुंबई :- काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज मोदी सरकारवर हल्लाबोल केला. मोदी सरकार कोरोना परिस्थिती हाताळण्यात पूर्णत: अपयशी ठरले. केंद्राच्या निष्काळजीमुळे लसीकरण मोहीम फसली आहे, असे नाना पटोले म्हणाले. लसीकरण केंद्राबाहेर लोकांची प्रचंड गर्दी आहेत. १७ कोटी जनतेला लस दिल्याचे मोदी सरकार सांगते, पण लाखो लोकांची दुसऱ्या डोसची कालमर्यादा उलटून गेली, तरीही त्यांना दुसरा डोस मिळाला नाही. केंद्राने कोरोना प्रतिबंधक लसीचे ‘राष्ट्रीय धोरण’ जाहीर करावे, अशी मागणी नाना पटोले (Nana Patole) यांनी केली.

आज मुंबईत नाना पटोलेंनी पत्रकार परिषद घेतली. “लोकशाही शासन व्यवस्थेत न्यायव्यवस्था ही आत्मा समजली जाते. परंतु मोदी सरकारने आत्माच संपवण्याचे काम सुरू केले आहे. मोदी सरकारने सर्व नागरिकांना मोफत लस दिली जात असल्याची चुकीची माहिती सुप्रीम कोर्टात सादर केली. कोर्टाने कोविडमध्ये हस्तक्षेप करू नये, कोर्ट या विषयातील तज्ज्ञ नाही. सुप्रीम कोर्टाने देशातील कोरोनाची विदारक परिस्थिती पाहून टास्क फोर्स स्थापन केले. केंद्र लोकांच्या जिवाचे रक्षण करण्यात अपयशी ठरले आहे, कोर्टाने टास्क फोर्स स्थापन केल्याने त्यावर शिक्कामोर्तब झाले. असेही नाना पटोलेंनी अधोरेखित केले.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुभाव लक्षात घेता मोदी सरकारने नियोजन केले नाही. यामुळे हजारो लोक ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, लसींअभावी मृत्युमुखी पडत आहेत. मोदींचे आपत्ती धोरण आणि आपत्ती व्यवस्थापन किती पोकळ आहे, याची जागतिक प्रसारमाध्यमांनी पोलखोल केली. कोरोना महामारीचे संकट मोदी सरकार हाताळू शकत नाही. भारत एक जागतिक शक्ती म्हणून जगासमोर उभा राहिला होता. पण मोदींच्या नाकर्तेपणामुळे जगात भारताची नाचक्की झाली, अशी टीकाही नाना पटोलेंनी केली आहे.

ही बातमी पण वाचा : सामनाचा ‘सामना’ कसा करायचा ते पुढे ठरवू’ ;  नाना पटोलेंची  संजय राऊतांवर टीका 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button